या संकेतस्थळाचे डिझाइन, ती विकसित आणि त्याची देखभाल अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, गोवा सरकार, भारत यांनी केली आहे.
या संकेतस्थळाच्या मजकुराचा अचूकपणा व वर्तमानियता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले असले तरीही त्याचा विधिचे विधान म्हणून अन्वयार्थ लावू नये किंवा कोणत्याही कायदेशीर उद्देशासाठी त्याचा उपयोग केला जाऊ नये. कोणतीही संदिग्धता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांनी खात्याशी/खात्यांशी आणि/किंवा इतर स्रोताशी/स्रोतांशी सत्यापित करावे/तपासावे आणि योग्य तो व्यावसायिक सल्ला घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत हे खाते, या संकेतस्थळाच्या वापरासंबंधी उद्भवणार्या कोणत्याही खर्चासाठी, नुकसानीसाठी किंवा हानीसाठी ज्यात कोणत्याही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामस्वरूप नुकसान किंवा हानी, किंवा डेटाच्या वापरामुळे किंवा डेटाचा वापर संपल्यामुळे होणारा कोणताही खर्च, नुकसान किंवा हानी काहीही यासाठी जबाबदार असणार नाही.
या अटी व शर्ती भारतीय कायद्यांद्वारे व त्यांच्या अनुसार नियंत्रित केलेल्या असतील व त्यांचा अन्वयार्थ लावला जाईल. या अटी व शर्तींतर्गत उद्भवणारा कोणताही वाद भारतीय न्यायालयांच्या अखत्यारित असेल. या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या कोणत्याही माहितीमध्ये बिगर-सरकारी/खासगी संस्थांनी तयार केलेल्या व राखलेल्या हायपरटेक्स्ट लिंक्स किंवा माहितीचे पॉईंटर्स यांचा समावेश असू शकतो.
अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय हे लिंक्स व पॉईंटर्स केवळ तुमच्या सोयीसाठी देत आहे. तुम्ही जेव्हा बाहेरील संकेतस्थळाच्या लिंकची निवड करता, तेव्हा तुम्ही अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संकेतस्थळ सोडता आणि बाहेरील संकेतस्थळाच्या मालकांच्या/पुरस्कर्त्यांच्या गोपनीयता व सुरक्षा धोरणांच्या अधीन असता.
अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय सर्व वेळी अशा लिंक्ड पेजच्या उपलब्धतेची हमी देत नाही.
लिंक्ड संकेतस्थळांमधील कॉपीराईट साहित्याच्या वापराचे अधिप्रमाणन अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय करीत नाही. लिंक्ड संकेतस्थळाच्या मालकाकडून असे.
अधिप्रमाणन मिळविण्याचा सल्ला वापरकर्त्यांना दिला जातो. लिंक्ड संकेतस्थळे भारत सरकारच्या वेब मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतात की नाही याची हमी अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय देत नाही.