test

अग्निशमन सेवा संचालनालयाच्या स्थापनेनंतर 1984 साली गोवा राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र अस्तित्वात आले, तोपर्यंत अग्निशमन सेवा हे पोलिसांचे एक उपांग म्हणून काम करत होते. प्रशिक्षणासाठी साधनसुविधा विकसित करण्याकरिता चौ. मी. जमीन संपादित करण्यात आली. सुरुवातीला, गोवा अग्निशमक दल प्रशिक्षण केंद्राद्वारे स्थानिक सेवेच्या भरतीसाठी सहा महिन्यांच्या कालावधीचा फायरमॅन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि नंतर इतर राज्याच्या अग्निशमन सेवेच्या सहभागींसह प्रशिक्षण उपक्रमांचा विस्तार करण्यात आला. सध्या, गोवा राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्राद्वारे औद्योगिक व सेवारत कर्मचार्‍यांच्या विविध श्रेणींकरिता अग्नि सुरक्षा व्यवस्थापनावर नियमितपणे 17 विविध विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले जातात. कनिष्ठ अधिकारी अभ्यासक्रम उप-अधिकारी अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी भारत सरकारच्या गृह व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाद्वारे गोवा राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र हे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र म्हणून निर्धारित करण्यात आले आहे.
प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये काही निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्रात पूर्णवेळ उपलब्ध असतील या हेतूने वसतिगृह निर्माण करण्याची गरज जाणवली. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे वसतिगृहाचे बांधकाम हाती घेण्यात आले आणि मे मध्ये ते पूर्ण झाले. बांधलेले एकूण क्षेत्र चौ. मी. आहे. वसतिगृहामध्ये वसतिगृहाच्या वॉर्डनच्या निवासासह प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण कार्यालय, कोठीघर व कडक पृष्ठभागाचे प्रशिक्षण क्षेत्र यांचा समावेश होऊ शकतो. 

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे 21 मे 2018 रोजी सर्वसामान्य जनतेसाठी, शाळांसाठी, ग्रामपंचायतींसाठी व विविध स्वयंसहाय्य गटांसाठी अग्नि सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन यांच्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी व जागृती निर्माण करण्यासाठी हाय-टेक अग्नि सुरक्षा शैक्षणिक वाहन प्रस्तुत करण्यात आले. आतापर्यंत राज्यभरातील 17088 नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण उद्देशासाठी अग्नि सुरक्षा शैक्षणिक वाहनाची खालील वैशिष्ट्ये आहेत:

  • LED स्क्रीनसह मल्टिमिडिया LCD प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि दृक/श्राव्य प्रशिक्षणासाठी सार्वजनिक घोषणा यंत्रणा
  • विविध दोर्‍यांचे व लाईन्सचे प्रदर्शन
  • कार्डिओ पल्मोनरी रिसटेशन व रेस्पिरेशन सपोर्टसाठी ऑटोमेटेड मेनेकि
  • मूलभूत लाइफ सपोर्ट किट
  • विविध प्रकारचे स्ट्रेचर
  • अग्निशामक प्रशिक्षक युनिट
  • स्वयंचलित शोध व फायर अलार्म सिस्टम डेमो किट
  • विविध एलपीजी डिटेक्टर्स डेमो किट
  • लाईव्ह स्ट्रिमिंग डीव्हीआरसह टेलेस्कोपिक
वर्ष शाळांची/शैक्षणिक संस्थांची संख्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांची संख्या प्रशिक्षित नागरिक/सर्वसामान्य जनता खासगी व सरकारी कार्यालय प्रशिक्षित कर्मचारी
2018 49 11666 455 455
2019 22 2790 75 931
2020 04 472 -- 244
एकूण 75 14928 530 1630