test

गोवा राज्य अग्निशामक दल अधिनियम 1986 अन्वये स्थापित गोवा राज्य अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे प्रमुख हे संचालक असतात आणि त्याचे मुख्यालय व लॉजिस्टिक केंद्र पणजी येथे आहे. आपली अग्निप्रतिबंध, अग्निसुरक्षा, अग्निशामक व बचाव ही मुख्य उद्दिष्टे साधण्यासोबतच खात्यातर्फे सर्वसाधारणपणे संकटात असलेल्या  लोकांना मदत केली जाते.  आपल्या अग्नि प्रतिबंध, आग विझविणे व प्रशिक्षण यांमधील उपक्रमांद्वारे गेल्या काही वर्षांमध्ये खात्याने लोकांच्या जीविताची व मालमत्तेची बचत व संरक्षण करून बहुआयामी भूमिका प्राप्त केली आहे. राज्यातील लोक व मालमत्ता यांना आग व आपत्कालीन प्रसंग यांपासून प्रभावशाली संरक्षण देण्यासाठी खात्याचा विकास केला जात आहे. गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे अधिकारी व प्रशासकीय कर्मचारीवर्ग यांच्यासह मान्यताप्राप्त बळ 1088 आहे. संबंधित स्थानिक संस्थांच्या/नगरपालिकांच्या नगरवसाहतीत असलेल्या 14 फायर स्टेशनद्वारे म्हणजेच पणजी, वास्को, म्हापसा, पेडणे, पिळर्ण, फोंडा, कुंडई, जुने गोवे, डिचोली, वाळपई, मडगाव, वेर्णा, कुडचडे व काणकोण, ते पूर्णवेळ सेवा पुरविते.

खात्याने तीन विभागांमध्ये आपल्या प्रशासकीय कामाचे विकेंद्रीकरण केले आहे, म्हणजेच दक्षिण विभाग, केंद्रीय विभाग व उत्तर विभाग. विभागीय अधिकारी याला दक्षिण विभागासाठी व केंद्रीय विभागासाठी अनुक्रमे कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण विभाग, केंद्रीय विभाग व उत्तर विभाग यांचे कार्यान्वयन नियंत्रण अनुक्रमे विभागीय अधिकारी व सहायक विभागीय अधिकारी यांच्याकडे असते. दक्षिण विभाग, केंद्रीय विभाग व उत्तर विभाग यांच्या अधिकारक्षेत्राखालील फायर स्टेशन्स पुढीलप्रमाणे आहेत:-

विभागीय अधिकारी,
दक्षिण विभाग
यांच्या अधिकारक्षेत्रात मडगाव, कुडचडे, कुंकळ्ळी, काणकोण व वेर्णा फायर स्टेशन यांचा समावेश आहे
विभागीय अधिकारी,
केंद्रीय विभाग
यांच्या अधिकारक्षेत्रात फोंडा, वाळपई, डिचोली, कुंडई व जुने गोवे फायर स्टेशन यांचा समावेश आहे
विभागीय अधिकारी,
उत्तर विभाग
यांच्या अधिकारक्षेत्रात पेडणे, पर्वरी, म्हापसा, पिळर्ण, पणजी, वास्को फायर स्टेशन व मुख्यालय यांचा समावेश आहे

प्रत्येक फायर स्टेशनचा स्टेशन फायर अधिकारी/प्रभारी अधिकारी हा प्रमुख असतो. संबंधित फायर स्टेशनवर ड्युटीवर असलेले अधिकारी व अग्निसेवा कर्मचारी हे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींसह सर्व प्रकारच्या आगीच्या/आपत्कालीन घटनांच्या प्रकारांसाठी प्रथम प्रतिसादकर्ता असतील.

खात्याचे प्रशासकीय व लेखा विभाग यांचे उप-संचालक (प्रशासन)/कार्यालय प्रमुख आणि सहायक लेखा अधिकारी/आहरण व संवितरण अधिकारी हे प्रमुख असतात. अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे एकंदर नियंत्रण अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक यांच्याकडे निहित असते.

संस्था नियंत्रण.