test

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्याच तरतुदींन्वये, राज्याने राज्य आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करणे आवश्यक आहे. गोवा सरकारला राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी 200 कर्मचारीवर्ग अभिप्रेत आहे. यापैकी 50 अग्निशमन कर्मचार्‍यांचा घटक हा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचा आहे. निवड झालेल्या कर्मचार्‍यांना खालील गोष्टींच्या विविध पैलूंमध्ये प्रशिक्षण दिले जाते:

  • गतिमान पाणी/पूर बचाव प्रशिक्षण
  • वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता आणि नागरी शोध व बचाव प्रशिक्षण
  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल केंद्रात रासायनिक, जीवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल व अणु प्रशिक्षण 

 विशेष बचाव प्रशिक्षण अकादमी, दृष्टी विशेष प्रतिसाद सेवा प्रायव्हेट लि. च्या प्रशिक्षण संस्थेद्वारे गोवा राज्य अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या अधिकार्‍यांना व अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांना पूर बचाव प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे खात्याची अंतर्गत व पूराच्या पाण्याशी संबंधित आपत्कालीन प्रसंगांवेळची सज्जता सुधारेल. हा सहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रातील कोलाड येथील कुंडलिका नदीच्या किनार्‍यावर घेण्यात आला, जेथे एका तासासाठी धरणाचे दरवाजे उघडून नदीचा पूराच्या रूपात वाहता जलप्रवाह उपलब्ध होतो. अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या एकूण 40 अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी गतीमान पाणी/पूर बचाव प्रशिक्षणाचा चार बॅचेसमध्ये लाभ घेतला. :-
बॅच 11 अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांनी  गतीमान पाणी/पूर बचाव प्रशिक्षणाचा कोलाड, महाराष्ट्र येथे  06/05/2013 ते 11/05/2013 या काळात लाभ घेतला, ज्यात 01 विभागीय अधिकारी, 01  स्टेशन फायर अधिकारी व 09 फायर फायटर्स होते.
II बॅच : 10 अग्निशमन कर्मचार्‍यांनी  गतीमान पाणी/पूर बचाव प्रशिक्षणाचा कोलाड, महाराष्ट्र येथे  26/08/2013 ते 31/08/2013 या काळात लाभ घेतला, ज्यात 01  स्टेशन फायर अधिकारी, 01 उप-अधिकारी व 08 फायर फायटर्स होते.
III बॅच : 08 अग्निशमन कर्मचार्‍यांनी गतीमान पाणी/पूर बचाव प्रशिक्षणाचा कोलाड, महाराष्ट्र येथे 03/11/2014 ते 08/11/2014 या काळात लाभ घेतला, ज्यात 01  स्टेशन फायर अधिकारी, 01 उप-अधिकारी व 06 फायर फायटर्स होते.IV बॅच IV: 11 अग्निशमन कर्मचार्‍यांनी गतीमान पाणी/पूर बचाव प्रशिक्षणाचा कोलाड, महाराष्ट्र येथे 19/06/2016 ते 24/09/2016 या काळात लाभ घेतला, ज्यात 02 स्टेशन फायर अधिकारी व 09 फायर फायटर्स होते.

वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता
वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता हे आपत्कालीन वेळी प्रथम प्रतिसादकर्ते म्हणून काम करणार्‍या अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांना देण्यात येणारे एक सर्वसमावेशक प्रशिक्षण आहे. या कार्यक्रमामध्ये प्रथमोपचार व सीपीआर यांमधील अलीकडची प्रगती दिसून येते. वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता प्राथमिक बचावकर्त्यांना ती माहिती व कौशल्ये देतो जे त्यांना वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगाला प्रतिसाद देताना आत्मविश्वासाने व काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता असते.
वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता अभ्यासक्रम प्राथमिक व दुय्यम प्रसंग व्यवस्थापन, प्रगत प्रथमोपचार प्रक्रिया, वायूमार्ग व्यवस्थापन, प्राणवायू थेरेपी, सी-स्पाईन व्यवस्थापन, स्पायनल बोर्ड्स, पेशंट पॅकेजिंग, फार्माकोलॉजी, आघातजन्य इजा, वैद्यकीय इजा, प्रसूती, बहु अपघाती घटना, आणि ईएमएसमध्ये पेशंट ट्रान्स्फर.
प्रथम प्रतिसादकर्ते प्रश्न विचारून आणि जीवनावश्यक व परिस्थिती तपासून घटनेचे मूलभूत मूल्यांकन करतील.
 
नागरी शोध व बचाव (अर्बन सर्च ऍण्ड रेस्क्यू - यूएसएआर)
संरचना कोसळण्याच्या घटनांमध्ये नागरी शोध व बचाव (यूएसएआर) हा एक पूर्व नियोजित, स्वयं-पूरक, बहु-एजन्सी प्रतिसाद आहे. हा एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीला किंवा आपत्कालीन घटनेला दिलेला प्रतिसाद असू शकतो. औद्योगिक अपघात, स्फोट, नैसर्गिक आपत्ती व दहशतवादी कृत्ये यांमुळे इमारतींमध्ये, भूस्खलनामुळे किंवा घसरणीमुळे अडकलेल्या अपघातांचा बचाव करण्याची क्षमता यूएसएआरकडे असते.
यूएसएआर प्रशिक्षणामध्ये, प्राथमिक पृष्ठभागावरील अपघातींना काढणे, सुरुवातीचे बौद्धिक मेळावे घेणे, धोके ओळखणे व मार्किंग यंत्रणा स्थापन करणे, बचावाच्या तांत्रिक व विशेष घटकांमध्ये विस्तृत प्रशिक्षण. अंशत: किंवा पूर्णपणे कोसळलेल्या संरचनांमधून अडकलेल्या व जखमी बळींना  बाहेर काढण्यासाठी ढिगार्‍यात असलेल्या टिकून राहण्यायोग्य जागांपर्यंत बचावकर्त्याला पोहोचण्यास ही सर्व कौशल्ये एकत्रितरित्या मदत करतात. 

 

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलामध्ये खात्याची तुकडी तयार करण्यासाठी एक गट तयार केला आहे.  तुकडीला मूलभूत अग्निशमन व इतर संबंधित कौशल्यांसोबतच नागरी शोध व बचाव, वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता, गतीमान पाणी पूर बचाव यांमध्ये यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या बॅचमध्ये अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल तुकडीमधील 12 अग्निशामक कर्मचार्‍यांना अलीकडेच 5 Bn पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे, मावळ येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलात ज्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्या तुकडीचे नेतृत्व विभागीय अधिकारी श्री. राजेंद्र ए. हळदणकर यांनी केले. त्यांच्यासोबत स्टेशन फायर अधिकारी श्री. दिलीप गावस, स्टेशन फायर अधिकारी श्री. संतोष गावस, उप-अधिकारी श्री. दिलेश एच. गोवेकर, फायर फायटर श्री. सिद्धेश परब, फायर फायटर श्री. प्रवीण गांवकर, फायर फायटर श्री. बाबुराव टी. आरोंदेकर, फायर फायटर श्री. राजेंद्र एस. पेडणेकर, फायर फायटर श्री. सज्जन एस. मुडकुडकर, फायर फायटर श्री. सत्यजित एच. देसाई, फायर फायटर श्री. सचिन गांवकर व फायर फायटर श्री. नारायण टी. मोर्लेकर यांचा समावेश होता.
प्रशिक्षणार्थींना रासायनिक, जीवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल व अणु यांच्या विविध पैलुंमध्ये वर्गातील व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठीचा निधी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात आला आहे.
खात्याच्या संचालकांनी प्रशिक्षण सुविधांबाबत व राज्याच्या प्रशिक्षणाच्या गरजांबाबत जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना भेट दिली. Bn. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रभारी समादेशकांनी चर्चासत्रात भाग घेतला आणि रासायनिक, जीवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल व अणु प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा दाखविल्या. अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने रासायनिक, जीवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल व अणु प्रसंगांच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ला सज्ज करण्याची गरज आहे आणि खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल. सीबीआरएनमधून आपली राज्य आपत्ती प्रतिसाद दल तुकडी प्रशिक्षित करून घेणारे गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय हे देशातील पहिले आपत्कालीन प्रतिसाद खाते आहे.

 

test