test

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, राज्यातील नागरिकांना प्रभावशाली आयटी सोल्युशन्स देऊन अर्थपूर्ण पद्धतीने सार्वजनिक सेवा देण्यात सर्वोत्कृष्टता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नामध्ये, अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाने गोवा इलेक्ट्रॉनिक्सच्या सहयोगाने खाली नमूद केलेल्या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता नागरिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ई-डिस्ट्रिक्ट मिशन मोड प्रकल्पांतर्गत ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत;

सेवा नाव
प्राथमिक एनओसीसाठी सेवा
अर्ज अंतिम एनओसीसाठी
अर्ज एनओसीच्या नूतनीकरणासाठी
अर्ज आगीच्या/घटनांच्या माहितीसाठी

www.goaonline.gov.in वर अर्ज करावा आणि ऑनलाईन एनओसी मिळविण्यासाठी  स्वत:ची नोंदणी करावी. ही यंत्रणा 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली आहे आणि अर्जदारांकडून कोणताही अभिप्राय असल्यास ते प्रतिक्षेत आहेत. एखाद्या सेवेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

  • नाव, पत्ता, मोबाईल क्र., आधार क्र., जन्मतारीख, ई-मेल आयडी यासारखी मूलभूत माहिती देऊन www.goaonline.gov.in वर नोंदणी करा.
  • नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि अर्जाच्या नमुन्याचे तपशील देऊन व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून  कोणत्याही सेवेसाठी अर्ज करा.
  • अर्जाचा नमुना यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर, अर्जदाराला एसएमएस व ई-मेलद्वारे एक पोच क्रमांक प्राप्त होईल.
  • नंतर हा अर्ज खात्याच्या अधिकार्‍यांना ऑनलाईन मोडमध्ये सत्यापित व अधिप्रमाणित करण्यासाठी दृश्य स्वरूपात उपलब्ध असेल.
  • खात्याने एकदा मंजूर केलयानंतर अर्जदार ई-साईन केलेली एनओसी डाऊनलोड करू शकतो..
  • अर्जादाराला त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे व ई-मेलद्वारे नियमितपणे कळविले जाईल.

ऑनलाईन सेवेचे नागरिकांना लाभ:

  • एनओसी अर्जाचा नमुना सादर करण्यासाठी नागरिकांना खात्यांना भेट द्यावी लागत नाही. ते आता ऑनलाईन अर्ज करू शकतात व लागू शुल्क भरू शकतात.
  • अर्जाचे सर्व स्थिती अपडेट्स अर्जदाराला एसएमएसद्वारे व ई-मेलद्वारे कळविले जातील.
  • अर्जदार सेवांप्रतिचे अनुपालन गोवा ऑनलाईन पोर्टलद्वारे तपासू शकतात व मागे घेऊ शकतात.
  1.   तपासणीसाठी तपशीलवार प्रक्रिया (PDF, 271.91 KB)
     
  2.   अग्नि ना हरकत दाखला जारी करण्यासाठी फ्लोचार्ट (प्राथमिक व अंतिम) (PDF, 178.74 KB)
     
  3.   नागरिकांसाठी व केंद्रीय अर्जासाठी ई-सेवा वापरकर्ता मार्गदर्शिका (PDF, 3.05 MB)
     
  4.   खात्याच्या अधिकार्‍यांसाठी ई-सेवा वापरकर्ता मार्गदर्शिका (PDF, 2.51 MB)
     
  5.   संदर्भ : अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाकडून एनओसी/दाखला आवश्यक असलेल्या ठिकाणांबाबत मुख्य नगर नियोजक (प्रशासन), पणजी कडून 21/1/TCP/2017-19/2485 दिनांकित 09/12/2019 (PDF, 1.27 MB)

test