test

सुरक्षित गोवा 24x7 आपत्कालीन देखरेख यंत्रणा (ईमर्जन्सी मॉनिटरिंग सिस्टम – ईएमएस)

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे ध्येय म्हणजे इतर आपत्कालीन प्रसंगांना प्रतिसाद देण्यासोबतच आगीच्या विळख्यापासून गोव्याच्या नागरिकांच्या जीविताचा व मालमत्तेचा बचाव करणे.

आगीच्या घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी संवेदनशील ठिकाणी बसविण्यात आलेले अग्निसुरक्षा उपाय महत्त्वाची भूमिका बजावतात. संवेदनशील ठिकाणांवर बसविण्यात आलेले अग्नि संरक्षण उपाय हे आगीच्या प्रसंगांमध्ये त्वरित प्रतिसादासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक वसतिस्थानावर बसवावयाच्या प्रतिबंधात्मक व प्रतिसादात्मक उपायांवर खाते शिफारशी करते आणि ताबेदाराने त्याचे अनुपालन केल्यानंतर प्राथमिक ना हरकत दाखला जारी केला जातो. अनुपालन सत्यापित केल्यानंतर अंतिम ना हरकत दाखला दिला जातो. संवेदनशील वसतिस्थानांचे अनेक मालक आणि/किंवा ताबेदार बसविलेल्या उपकरणांची देखरेख करत नाहीत आणि जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा महत्त्वाचे उपकरण काम न करणे यामुळे प्रतिसाद समुहाच्या कामावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, प्रत्येक ठिकाणचे अग्नि सुरक्षा उपाय हे स्थानिक फायर स्टेशन्सशी आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जावेत असा प्रस्ताव आहे. यामुळे खात्याच्या नियंत्रण कक्षाला कोणत्याही बसविलेल्या अग्नि संरक्षण उपकरण न चालल्याची माहिती लगेच प्राप्त होऊ शकेल.