गोवा सरकार अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे

व्यवसाय सुलभता

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, राज्यातील नागरिकांना प्रभावशाली आयटी सोल्युशन्स देऊन अर्थपूर्ण पद्धतीने सार्वजनिक सेवा देण्यात सर्वोत्कृष्टता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नामध्ये, अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाने गोवा इलेक्ट्रॉनिक्सच्या सहयोगाने खाली नमूद केलेल्या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता नागरिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ई-डिस्ट्रिक्ट मिशन मोड प्रकल्पांतर्गत ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत;

सेवा नाव
प्राथमिक एनओसीसाठी सेवा
अर्ज अंतिम एनओसीसाठी
अर्ज एनओसीच्या नूतनीकरणासाठी
अर्ज आगीच्या/घटनांच्या माहितीसाठी

www.goaonline.gov.in वर अर्ज करावा आणि ऑनलाईन एनओसी मिळविण्यासाठी  स्वत:ची नोंदणी करावी. ही यंत्रणा 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली आहे आणि अर्जदारांकडून कोणताही अभिप्राय असल्यास ते प्रतिक्षेत आहेत. एखाद्या सेवेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

  • नाव, पत्ता, मोबाईल क्र., आधार क्र., जन्मतारीख, ई-मेल आयडी यासारखी मूलभूत माहिती देऊन <www.goaonline.gov.in वर नोंदणी करा.
  • नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि अर्जाच्या नमुन्याचे तपशील देऊन व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून  कोणत्याही सेवेसाठी अर्ज करा.
  • अर्जाचा नमुना यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर, अर्जदाराला एसएमएस व ई-मेलद्वारे एक पोच क्रमांक प्राप्त होईल.
  • नंतर हा अर्ज खात्याच्या अधिकार्‍यांना ऑनलाईन मोडमध्ये सत्यापित व अधिप्रमाणित करण्यासाठी दृश्य स्वरूपात उपलब्ध असेल.
  • खात्याने एकदा मंजूर केलयानंतर अर्जदार ई-साईन केलेली एनओसी डाऊनलोड करू शकतो..
  • अर्जादाराला त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे व ई-मेलद्वारे नियमितपणे कळविले जाईल.

ऑनलाईन सेवेचे नागरिकांना लाभ:

  • एनओसी अर्जाचा नमुना सादर करण्यासाठी नागरिकांना खात्यांना भेट द्यावी लागत नाही. ते आता ऑनलाईन अर्ज करू शकतात व लागू शुल्क भरू शकतात.
  • अर्जाचे सर्व स्थिती अपडेट्स अर्जदाराला एसएमएसद्वारे व ई-मेलद्वारे कळविले जातील.
  • अर्जदार सेवांप्रतिचे अनुपालन गोवा ऑनलाईन पोर्टलद्वारे तपासू शकतात व मागे घेऊ शकतात.
      1.  
    1. संबंधित मालक/कब्जेदाराने दरवर्षी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात (परिशिष्ट-अ) एक स्व-घोषणापत्र सादर करावे लागेल, ज्यामध्ये असे नमूद केले असेल की परिसरात बसवलेल्या अग्निसुरक्षा व्यवस्था नियमितपणे राखल्या जातात, पूर्णपणे कार्यरत आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत त्या चालवता येतात. (PDF, 254 KB)

    2. सेवा माहिती-अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय (PDF, 271.91 KB)

    3. तपासणीसाठी तपशीलवार प्रक्रिया (PDF, 271.91 KB)

    4. अग्नि ना हरकत दाखला जारी करण्यासाठी फ्लोचार्ट (प्राथमिक व अंतिम) (PDF, 178.74 KB)

    5. नागरिकांसाठी व केंद्रीय अर्जासाठी ई-सेवा वापरकर्ता मार्गदर्शिका (PDF, 3.05 MB) (PDF, 3.05 MB)

    6. खात्याच्या अधिकार्‍यांसाठी ई-सेवा वापरकर्ता मार्गदर्शिका (PDF, 2.51 MB)

    7. संदर्भ : अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाकडून एनओसी/दाखला आवश्यक असलेल्या ठिकाणांबाबत मुख्य नगर नियोजक (प्रशासन), पणजी कडून 21/1/TCP/2017-19/2485 दिनांकित 09/12/2019 (PDF, 1.27 MB)

Accessibility Toolbar