गोवा सरकार अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे

प्रशिक्षण अभ्यासक्रम

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने 1985 पासून गोवा राज्य अग्निशमन सेवा दल प्रशिक्षण केंद्र स्थापन केले, जेथे सरकारी,    निम-सरकारी, बँकिंग क्षेत्र, खासगी पुरस्कृत उमेदवार, आतिथ्यशीलता उद्योग, नागरिक स्वयंसेवक इ. यांच्यासाठी खास तयार केलेले 15 अभ्यासक्रम नियमितपणे चालविले जातात.

देशाच्या विविध भागांतील एकूण 47,459 उमेदवारांनी सांत-इनेज, पणजी येथील गोवा राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्रात 1 दिवशीय प्रशिक्षणापासून ते 6 महिन्यांच्या    सर्वसाधारण अग्निप्रतिबंध व अग्निशामक अभ्यासक्रमांना उपस्थिती लावली आहे.

हे प्रशिक्षण केंद्र, भारत सरकारच्या गृह व्यवहार मंत्रालयाच्या सर्वसाधारण नागरी संरक्षण व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे. कनिष्ठ अधिकार्‍यांचा अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी ते गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकारच्या  राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाशी संलग्न आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये निवासी स्वरुपाच्या काही अभ्यासक्रमांचा समावेश असल्याने प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृहाची इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. वसतिगृहात वॉर्डनच्या निवासासह 40 प्रशिक्षणार्थींची निवासाची सोय होऊ शकते.

 
Exit grid
Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Accessibility Toolbar