गोव्यातील मार्च ते मे 2021 पर्यंतच्या तापमानाच्या मोसमी दृष्टिकोनावरील भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गोव्यात अति उष्ण तापमान परिस्थिती असेल आणि कमाल तापमानामध्ये सर्वसाधारण कमाल तापमानापेक्षा अधिक वाढ होईल व किमान तापमान किमान तापमानापेक्षा अधिक असेल, त्यासाठी समर्पक रेड कलर कोड देण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेच्या सज्जतेबाबत व शमन उपाययोजनेबाबत खाली महत्त्वाच्या लिंक्स आहेत (आयईसी साहित्य).
https://ndma.gov.in/Resources/awareness/heatwave
https://ndma.gov.in/Resources/awareness/lightning
https://ndma.gov.in/Resources/sign_videos/Early-warning-Heatwave
https://ndma.gov.in/Resources/sign_videos/heat-wave-preparedness
https://ndma.gov.in/Resources/booklets
तुम्ही आग थांबवू शकता
उंच इमारतींना आगीचा धोका अधिक असतो, आणि असा काही प्रसंग ओढविल्यास, नागरिकांना सुरक्षा उपायांची माहिती असावी हे आम्ही सुनिश्चित करू इच्छितो.
करावे
- बचाव मार्ग, जिना, आश्रय स्थाने व फायर अलार्मचे ठिकाण याबाबत माहिती करून घ्या.
- प्रत्येक मजल्यावर दिलेल्या प्रथमोपचार होज रील व अग्निशामक यांचे योग्य प्रचालन व वापर यामध्ये स्वत:ला व सुरक्षा कर्मचार्यांना प्रशिक्षित करा. तसेच, तळमजल्यावरील/तळघरातील फायर पंप आणि छतावरील बूस्टर पंप सुरू करण्याचे आणि आग लागल्याच्या प्रसंगी अग्निशमन खात्याला माहिती देण्याच्या पद्धतीबाबतही त्यांना प्रशिक्षण द्या.
- जिन्याचे, कारखाना इमारतीच्या/कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे फायर डोअर्स नेहमी बंद ठेवा.
- सर्व अग्नि सुरक्षा उपकरणे जसे, फायर पंप्स, वेट रायझर-कम-डाऊनकमर, स्प्रिंकलर इन्स्टॉलेशन, अग्निशामक इ. सुस्थितीत ठेवावीत. यांच्या समयोचित वापराने आग सुरूवातीच्या टप्प्यावर नियंत्रित करण्यात/विझविण्यात मदत होईल, जेणेकरून जीविताची व मालमत्तेची हानी कमी होईल.
- नेहमी चांगली स्वच्छता राखा.
- आगीच्या प्रसंगी, फायर लिफ्टसह सर्व लिफ्ट बंद ठेवा.
- निर्वासन कवायतींचा नियमित सराव करा.
- आगीची तीव्रता कितीही असली तरीही, अग्निशमन दलाला लवकरात लवकर कळवा.
- अग्नि सुरक्षेच्या बाबतीत अग्निशमन दलाचा सल्ला व मार्गदर्शन घ्या.
- आगीच्या प्रसंगी, अग्निशमन खात्याच्या कर्मचार्यांना आगीचे ठिकाण व व्याप्तीबाबतची माहिती, कोणत्याही अडकलेल्या व्यक्ती असल्यास त्यांची माहिती द्या, आणि ते विनंती करू शकतील अशी इतर कोणतीही माहिती द्या. तुम्हाला मदत करण्यासाठी त्यांना मदत करा.
- लक्षात ठेवा, फायरमॅन तुमचा मित्र आहे.
टाळावे
- इमारतीच्या अंगणात अतिक्रमण किंवा साठवणूक होऊ देऊ नका. आपत्कालीन प्रसंगी, अग्नि व बचाव उपकरणे ठेवण्यासाठी व वापरण्यासाठी खुल्या अंगणाची गरज असते.
- समान कॉरिडोरमध्ये व जिन्यामध्ये साठवणूक किंवा अडचणी होऊ देऊ नका. हे निकास मार्ग, खुले राखल्यास, आगीच्या प्रसंगी सहज बचाव करण्यास मदत करतील.
- जिन्यांचे फायर डोअर्स खुले ठेवण्यास देऊ नका. आगीच्या प्रसंगी, उष्णता व धूर जिन्यांमध्ये प्रवेश करतात व लोकांच्या बचावाला अडथळा करतात.
- आगीच्या प्रसंगी, बचावासाठी लिफ्टचा वापर करू नका. ती मध्येच बंद पडून आतमध्ये लोक अडकू शकतात. केवळ जिन्याचा वापर करा.
- इलेक्ट्रीक मीटर रूम्सचा वापर साठवणुकीची जागा म्हणून, फेकण्याच्या जागा किंवा नोकरांसाठी राहण्याची जागा म्हणून करू नये. ते संभाव्य आगीची धोका स्थाने आहेत.
- दिवाळीच्या दिवसांमध्ये, कोणत्याही ज्वलनशील वस्तू बाल्कनींमध्ये ठेवू नका. बाल्कनींमध्ये किंवा इमारतीच्या लाईनबाहेर कपडे वाळत घालू नका. उडणार्या फटाक्यांमुळे भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत.
- परवानगी असलेल्या उद्देशाशिवाय इतर कोणत्याही उद्देशासाठी तळघराचा वापर करू नका. हवा चांगल्या प्रकारे खेळत नसल्याने, तळघरातील वस्ती किंवा काम, लोकांसाठी मृत्यूचा सापळा बनेल
- इमारतीमधील जोडलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे आग एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर पसरते. त्या प्रत्येक मजल्यावर स्लॅब स्तरावर सील करा.
- एअर कंडिशनच्या वाहिन्या एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर जाऊ देऊ नका, कारण आग, उष्णता व धूर या वाहिन्यांद्वारे इमारतीच्या इतर भागामध्ये पसरतात. शक्य असल्यास विशिष्ट मजल्यावर त्यांची विभागणी करा, जेणेकरून आग, उष्णता व धूर पसरण्याला आळा बसेल आणि हानी कमी होईल.
- फायर डिटेक्टर्स किंवा स्प्रिंकलर हेड्स कधीही रंगवू नका किंवा कोट करू नका. तसे केल्यास, ते अकार्यक्षम बनतील.
- आग लागलेल्या इमारतीत मौल्यवान वस्तू आणण्यासाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी पुन्हा प्रवेश करू नका. तुमच्या जीवावर बेतू शकते.
- समान कॉरिडोरच्या भिंती व छत लाकडी पॅनलिंग यासारख्या ज्वलनशील वस्तुंनी सजवू नका. आगीच्या प्रसंगी बचाव मार्गात ते विनाकारण आगीचा धोका निर्माण करतात.
- अग्निशामक टाक्यांचा गैरवापर होऊ देऊ नका किंवा त्या रिकाम्या ठेवू नका. टाकीकडील प्रवेश सहज असू द्या. तुम्हाला/अग्निशमन सेवेला कोणत्याही वेळी त्यांची गरज भासू शकते.
- वेट रायझर सिस्टमची हानी टाळा. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी आग विझविण्यासाठी/नियंत्रणात ठेवण्यासाठी वापर करण्याकरिता ती उपलब्ध केलेली आहे. त्याची चांगली देखरेख तुमची सुरक्षितता सुनिश्चित करते.
- फायर/स्मोक डिटेक्शन सिस्टम बंद करू नका. यामुळे आग मोठे स्वरूप धारण करेपर्यंत ती लक्षात न येता राहू शकते.
- आगीच्या प्रसंगी संपूर्ण इमारतीची वीज बंद करू नका. यामुळे इमारतीत बसविलेल्या सर्व अग्निसुरक्षा व अग्निशमन यंत्रणा बंद होतील.
इमारतीत कोणत्याही जोडण्या व सुधारणा करू नका. अशी कामे हाती घेण्यापूर्वी अग्निशमन दलाचा सल्ला घ्या.
अग्निशमन सराव व निर्वासन प्रक्रिया यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे(PDF, 777.98 KB)
अग्निसुरक्षेसाठी सूचना – प्रौढ
स्वयंपाकातील सुरक्षा
- स्वयंपाक करताना लक्ष द्या व सतर्क राहा.लक्ष न दिल्याने स्वयंपाकघरात आग लागू शकते.
- कपड्यांचे सर्व सुटे भाग एकत्र बांधा आणि आगीपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- टॉवेल्स, लाकडी चमचे व खाद्य पॅकेज यांना आग लागू शकते. या वस्तू शेगड्यांपासून व खुल्या ज्वाळांपासून दूर ठेवा.
- आगकाड्या व लायटर्स मुलांपासून दूर ठेवा.
- गरम भांडी मुलांपासून दूर ठेवा कारण त्यामुळे तीव्रतेने भाजू शकते. तरूण मुलांनी स्वयंपाकाच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतर ठेवावे. मोठ्या मुलांना स्वयंपाक सुरक्षितेबाबत शिकवा.
भाजणे व पोळणे प्रतिबंधित करणे.
- मुलांना तिथे पोहोचायला आवडते त्यामुळे ओट्याच्या व टेबलच्या काठापासून गरम खाद्यपदार्थ व द्रवपदार्थ दूर ठेवा.
- स्वयंपाक करताना किंवा गरम द्रव्ये हाताळताना मुलांना धरू नका. त्यामुळे तुमच्या बाळाला भाजू शकते किंवा पोळू शकते.
- मुलाला आंघोळ घालण्यापूर्वी गरम पाण्याचे तापमान तपासा.
- काळजी घ्या आणि पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारा गज बुडविलेल्या पाण्याच्या बादलीपासून मुलांना दूर ठेवा.
विद्युत उपकरणांबाबत सुरक्षा.
- विद्युत सॉकेटवर अधिक ताण पडणार नाही याची काळजी घ्या कारण त्यामुळे अतिउष्णता होऊन आग लागू शकते.
- ओल्या हातांनी, ओल्या कपड्यांमध्ये किंवा चपलांमध्ये विद्युत उपकरणे वापरू नका.
- इस्त्री, टोस्टर्स आणि पाणी तापविण्याचा गज यांसारखी विद्युत उपकरणे वापरल्यानंतर लगेच अनप्लग करा आणि सुरक्षित ठेवा व मुलांपासून दूर ठेवा.
- विद्युत वायर्स जमिनीवर किंवा गालिच्याखाली पडलेल्या नाहीत हे सुनिश्चित करा. झिजलेल्या किंवा खराब झालेल्या वायर्स त्वरित बदला.
खुल्या ज्वाळांबाबत सुरक्षा
- जळत्या मेणबत्त्या, मच्छर अगरबत्त्या व तेलाचे दिवे मुलांपासून आणि फर्निचर, पडदे व इतर ज्वलनशील वस्तुंपासून दूर ठेवा. झोपायला जाण्यापूर्वी मेणबत्त्या विझवायला व तेलाचे दिवे बंद करायला विसरू नका.
- सिगारेटची थोटके योग्यरित्या विझविली आहेत व ती कचरापेटीत न टाकता ऍशट्रेमध्ये टाकली आहेत हे सुनिश्चित करा.
फटाक्यांबाबत सुरक्षा सूचना
- अंगाला घट्ट बसणारे कॉटन कपडे घाला जे फटाके उडविताना सहज पेट घेणार नाहीत.
- मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली फटाके उडविण्यास मुलांना शिकवा.
- फटाके पेटविण्यासाठी लांब काठी वापरा. तुमच्या हातात धरून फटाके पेटविणे असुरक्षित आहे.
- पहिल्या वेळेला न पेटलेला फटाका पुन्हा पेटविणे धोक्याचे असते.
- फटाके पेटविताना रेती किंवा पाणी भरलेली एखादी बादली जवळ ठेवा.
- फटाके पेटविण्यापूर्वी झाडांपासून व घरांपासून दूर असलेली खुली जागा शोधा. घरात फटाके पेटवू नका.
आगीच्या आपत्कालीन प्रसंगातील सुरक्षा
- तुमच्या कुटुंबासोबत एक अग्नि बचाव योजना तयार करा व त्याचा सराव करा आणि घराच्या बाहेर भेटण्यासाठी एक सुरक्षित जागा निश्चित करा.
- आग लागल्यास त्वरित घरातून बाहेर पडा.
- खूप धूर झाला असेल व काहीच दिसत नसेल तर, खाली बसा व शक्य तितक्या लवकर घराच्या बाहेर रांगत चला.
- गोव्यातील अग्निशमन दलाचे (101/112) व रुग्णवाहिका (108) यांच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांची माहिती ठेवा.
Citizen’s Handbook On Fire Safety And Disaster Preparedness(PDF, 1.14 MB)
Citizen’s Handbook On Fire Safety And Disaster Preparedness (Konkani) (PDF, 3.34 MB)
अग्नि सुरक्षा व आपत्ती सज्जता यावरील नागरिकांची माहितीपुस्तिका (मराठी).(PDF, 1.71 MB)
अग्निसुरक्षेसाठी सूचना – मुले
आग व भाजणे टाळणे.
- कोणत्याही गरम वस्तूपासून दूर राहा.
- उकळत्या पाण्यापासून व गरम तेलांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- पिण्यापूर्वी गरम द्रव्यांचे तापमान तपासा.
- स्वयंपाकाच्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवा.
विद्युत उपकरणांबाबत सुरक्षा
- तुमच्या पालकांना विचारूनच विद्युत उपकरणे वापरा.
- तुमचे हात, कपडे किंवा चपला ओल्या असल्यास विद्युत उपकरणे वापरू नका.
- तुम्हाला झिजलेल्या वायर्स किंवा वाहिन्या दिसल्या तर, त्यांना स्पर्श करू नका. त्वरित पालकांना सांगा.
- विद्युत आऊटलेटमध्ये बोट, खेळणी किंवा इतर वस्तू घालू नका.
- विद्युत सॉकेटवर अति ताण घालू नका कारण त्यामुळे अति उष्णता तयार होऊन आग लागू शकते.
फटाक्यांबाबत सुरक्षा
- फटाके पेटविण्यासाठी लांब काठी वापरा.
- एक हात लांबीवर फटाके लावा.
- मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली फटाके उडवा.
- अंगाला घट्ट बसणारे कॉटन कपडे घाला जे फटाके उडविताना सहज पेट घेणार नाहीत.
- पहिल्या वेळेला न पेटलेला फटाका पुन्हा पेटविणे धोक्याचे आहे.
- फटाके पेटविण्यापूर्वी झाडांपासून व घरांपासून दूर असलेली खुली जागा शोधा.
- फटाके पेटविताना रेती किंवा पाणी भरलेली एखादी बादली जवळ ठेवा.
खुल्या ज्वाळांबाबत सुरक्षा
- जळत्या मेणबत्त्या व तेलाचे दिवे फर्निचर, अंथरूण, पडदे, गालिचे, पुस्तके व इतर ज्वलनशील वस्तुंपासून व सजावटीपासून दूर ठेवावे.
- आगकाड्या व लायटर्स यांपासून दूर राहा.
- झोपायला जाण्यापूर्वी मेणबत्त्या विझवायला व तेलाचे दिवे बंद करायला विसरू नका.
आगीच्या आपत्कालीन प्रसंगातील सुरक्षा
- जळत्या घरात पुन्हा जाऊ नका, एकदा तुम्ही बाहेर आलात की बाहेरच राहा!
- खूप धूर झाला असेल व काहीच दिसत नसेल तर, खाली बसा व शक्य तितक्या लवकर घराच्या बाहेर रांगत चला.
- तुम्ही जर आग लागलेल्या एखाद्या इमारतीत असाल तर, बाहेर जाण्यासाठी एलिव्हेटरचा किंवा लिफ्टचा वापर न करता, जिन्याचा वापर करा.
- गोव्यातील अग्निशमन दलाचे (101/112) व रुग्णवाहिका (108) यांच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांची माहिती ठेवा.
अग्नि सुरक्षा व आपत्ती सज्जता यावरील विद्यार्थी मार्गदर्शिका. (PDF, 3.71 MB)
आगीच्या बाबत जीवन मार्गदर्शिका(PDF, 5.47 MB)
आग इंधन + उष्णता + प्राणवायू
ज्वलनाचा त्रिकोण
सर्व ज्वलन प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या घटकांचा समावेश असतो:-
- एखादे ज्वलनशील साहित्य किंवा इंधन याची गरज असते.
- प्राणवायू, हवेतील किंवा इतर कोणताही प्राणवायू पुरविणारा पदार्थ याची गरज असते.
- उष्णता (ज्या तापमानाला ज्वलन सुरू होईल त्या तापमानापर्यंत दोन घटकांमधीलल एक भाग गरम केला पाहिजे)
तीन घटक असेपर्यंतच ज्वलनाची प्रक्रिया होईल.
त्यातील एकाच्याही नसण्याने त्रिकोण बिघडेल आणि पुढे ज्वलनाची प्रक्रिया थांबेल.
एलपीजी सुरक्षा सूचना:
- कोणतीही भेग पडलेली आहे का यासाठी रबर ट्युब्स नियमितपणे तपासा, भेग असल्यास दोन वर्षांतून किमान एकदा रबर ट्युब बदला.
- पहिल्यांदा काडीपेटी पेटवून नंतर तुमच्या शेगडीचा बर्नर नॉब उघडा.
- गळतीच्या प्रसंगी हे करा
- घरातील कोणतेही विद्युत उपकरण सुरू/बंद करू नका.
- काडीपेट्या, लाईटर, शेगडी इ. पेटवू नका.
- सिलिंडर वापरण्यापूर्वी सिलिंडर वाल्वमधून व जॉईंटमधून काही गळती नाही ना हे साबणाचे द्रावण लावून तपासा.
- सिलिंडर नेहमी वाल्व वर असलेल्या स्थितीत उभा आणि जमिनीच्या सपाट भागावर ठेवावा.
- वाल्वमधून गळती असेल तर त्वरित सेफ्टी कॅप लावा किंवा वाल्वमधील गळती थांबविण्यासाठी तुमचा आंघोळीचा साबण वापरा.
- सिलिंडर खुल्या जागेत घेऊन चला आणि वितरकाशी किंवा आपत्कालीन सेवा कक्षाशी संपर्क साधा.
आगीच्या प्रसंगी काय करावे
- धावू नका
- घाबरू नका
- शौचालयात आसरा घेऊ नका
- आगीबाबत अग्निशमन दलाला कळवा, शेजार्यांना सतर्क करा
- तुमच्या मागील सर्व दरवाजे बंद करा
- गच्चीऐवजी तळघरात चला
- बचावासाठी लिफ्टचा वापर करू नका
- जवळच्या बचाव मार्गांचा व उपलब्ध जिन्याचा वापर करा
- शक्य असल्यास अग्निशामकाचा वापर करा
- तुम्हाला आगीचा /दिलेल्या अग्निशामक यंत्रणेचा तपशील माहीत असल्यास, अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना ते आल्यावर कळवा
अग्निशमन दलाला कसे बोलवावे
- नियंत्रण कक्षातील ड्युटी अधिकारी तुमचा कॉल स्वीकारतो
- त्याला तुमचा सविस्तर पत्ता, घटनेचे स्वरुप व तुम्ही कॉल करीत असलेला दूरध्वनी क्रमांक द्या
- रिसिव्हर ठेवा आणि वाट पाहा. कॉल सत्यापित करण्यासाठी नियंत्रण कक्ष पुन्हा कॉल करेल
- फायर पर्सनची वाट पाहा, फायरमॅनला सहकार्य करा
- अग्नि व निर्वासन सराव आयोजित करणे
मॉक ड्रील
सरकारद्वारे/निम-सरकारी संस्थांद्वारे, शाळा-महाविद्यालयांद्वारे, शॉपिंग मॉल्सद्वारे, पंचतारांकित हॉटेल्सद्वारे व औद्योगिक वसाहतींद्वारे वेळोवेळी मॉक ड्रील्स आयोजित करण्यात येतात. अग्निशमन दल मॉक ड्रील्समध्ये सहभागी होते आणि सहभागींना अग्निशामक उपकरणांच्या वापराबाबत व आपत्कालीन प्रसंगांमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करते व प्रशिक्षण देते.
मॉक ड्रील्स आयोजित करण्याची उद्दिष्टे:
- आग लागते तेव्हा उपाययोजना करणे.
- आग विझविण्याच्या वेळी सावधगिरीच्या उपाययोजना करणे.
- जळणार्या इमारतीतून बाहेर पडणे.
- आगीत बळी पडलेल्यांना मदत करणे.
- आग नियंत्रणात आणण्यासाठी रेती, चिकणमाती, पाणी व ओले कपडे यांचा वापर करणे.
मॉक ड्रील्स दरम्यान, आगीच्या ठिकाणाहून स्वत: कसे बाहेर पडावे, नजीकच्या इस्पितळांशी कसा संपर्क साधावा व वैद्यकीय मदत वेळेत कशी मिळवावी याबाबत लोकांना काळजीपूर्वक माहिती दिली जाते. एकंदरीत, नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. मॉक ड्रील संपल्यानंतर नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मॉक ड्रील्स पाहिल्यानंतर सामान्य नागरिकांना स्वत:चा बचाव कसा करावयाचा याची कल्पना येते. या मॉक ड्रील्समध्ये लोक अग्नि प्रतिबंधक उपकरणांचा योग्य वापर कसा करू शकतात याचा समावेश आहे.