test

अग्निशमन व आपत्ती सेवा संचालनालय हे आपत्ती प्रतिसादासाठी राज्य यंत्रणेचा एक भाग असल्याने ते सर्वसामान्य अग्निसुरक्षा व्यवस्थापन व आपत्ती सज्जता यांबाबत सामुदायिक जागृती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. हा दृष्टिकोन पुढे शैक्षणिक संस्था (माध्यमिक व प्राथमिक शाळा) आणि सामान्यपणे ग्रामपंचायत नागरिक यांवर लक्ष केंद्रित करते.

माध्यमिक शाळा स्तरावर, 2010 पासून मूलभूत अग्निसुरक्षा व निर्वासन ड्रील यामध्ये माध्यमिक शाळा शिक्षकांसाठी सातत्याने “प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण” हा कार्यक्रम सुरू आहे. पुढे, हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात आणि सर्वसामान्य सज्जतेचा भाग म्हणून निर्वासन ड्रील्स घेण्यात येतात.

कॅलेंडर वर्ष शाळांची संख्या शिक्षकांची संख्या
2010 660 886
2011 562 881
2012 159 339
2013 264 505
2014 143 191
2015 309 588
2016 139 225
2017 167 274
2019 101 133
2020 -- --
2021 122 224
2022 -- --
2023 128 218
एकूण बेरीज 2754 4464

प्राथमिक शाळेमध्ये अग्निसुरक्षा जागृती निर्माण करण्याचा एक भाग म्हणून सुरक्षित शाळा सुरक्षित भारत हा कार्यक्रम एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आला. हा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, शिक्षण संचालनालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि अंडररायटर्स लॅबोरेटरीज (भारत) यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे संयुक्त उपक्रम आहे. सुरक्षित शाळा सुरक्षित भारत ही संकल्पना मुलांची सुरक्षा करण्यासाठी व त्यांना सुरक्षित कसे राहावे हे शिकविण्यासाठी सुरक्षित भारत निर्माण करणे या उद्देशासाठी प्रयत्नशील  आहे. इयत्ता पहिली ती चौथी पर्यंतच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्याद्वारे कुटुंबांचा सुरक्षितता संस्कृतीचा स्तर वाढविणे हा उद्देश आहे. शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून  अग्निसुरक्षा शिक्षण समाविष्ट करणे हा दृष्टिकोन आहे. खात्यातर्फे 2015 पासून गोवा राज्यातील 334 शाळांमधील 467 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि पुढे प्रशिक्षित शिक्षकांनी त्यांच्या संबंधित शाळांमधील 33027 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

गोवा राज्यातील प्राथमिक शाळेमध्ये अग्निसुरक्षा जागृती निर्माण करण्याचा भाग म्हणून सुरक्षित शाळा सुरक्षित भारत या कार्यक्रमाचे 14 एप्रिल 2015 रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, शिक्षण संचालनालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि अंडररायटर्स लॅबोरेटरीज (भारत) यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे संयुक्त उपक्रम आहे. सुरक्षित शाळा सुरक्षित भारत ही संकल्पना मुलांची सुरक्षा करण्यासाठी व त्यांना सुरक्षित कसे राहावे हे शिकविण्यासाठी सुरक्षित भारत निर्माण करणे या उद्देशासाठी प्रयत्नशील  आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्याद्वारे कुटुंबांचा सुरक्षितता संस्कृतीचा स्तर वाढविण्यासाठी ही मोहीम आहे.

या उद्देशासाठी आठवड्यातून किमान एक तास याला समर्पित करून शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अग्निसुरक्षा शिक्षण समाविष्ट करणे हा दृष्टिकोन आहे. प्राथमिक स्तरावर (इयत्ता पहिली ते चौथी) विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी आणि अग्नि प्रतिबंध व अग्नि सुरक्षा शिकविणार्‍या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेण्यासाठी या प्रशिक्षण मॉड्युलची रचना करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात, प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण या कार्यक्रमासाठी तिसवाडी तालुक्यातील 27 शाळांमधील 46 प्राथमिक शाळा शिक्षक दोन बॅचमध्ये घेण्यात आले. “आग व सुरक्षा, चांगली आग, वाईट आग” या विषयावरील मॉड्युल शिक्षकांना देण्यात आले ज्यामध्ये अग्निसुरक्षेच्या विविध घटकांचा समावेश होता आणि ते सॉफ्टवेअरमध्येही देण्यात आले जेणेकरून ते त्यांच्या संबंधित शाळांमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतील.

कॅलेंडर वर्ष शिक्षकांची संख्या शाळांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या
2015 46 27 3730
2016 98 50 7571
2017 124 113 3398
2018 104 71 11775
2019 95 73 6553
2020 -- -- --
2021 313 201 --
एकूण बेरीज 780 535 33027

ग्राम स्तरावर, गावातील लोकांमध्ये व गोवा राज्यातील ग्रामपंचायत कार्यधारकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी खात्यातर्फे आपत्ती सज्जता व अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाते. या कार्यक्रमांतर्गत 2014 साली उत्तर व दक्षिण गोव्यातील 182 ग्राम पंचायतींमधील 106 ग्राम पंचायती व्यापल्या गेल्या होत्या आणि पुढील विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे.

संचालनालयातर्फे पंचायत संचालनालय, मेसर्स भारत पेट्रोलियम महामंडळ मर्यादित, मेसर्स हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित व मेसर्स इंडियन ऑईल महामंडळ मर्यादित यांच्या समन्वयाने गोवा राज्यातील सर्व पंचायतींच्या लोकांमध्ये आपत्तीच्या किंवा अनर्थाच्या (नैसर्गिक व मानवी) प्रसंगी अग्निसुरक्षा व आपत्ती सज्जतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर मूलभूत अग्नि सुरक्षा व आपत्ती सज्जता प्रशिक्षण आयोजित केले जाते.

ज्या ग्रामस्थांनी यापूर्वीच मूलभूत अग्नि सुरक्षा व आपत्ती सज्जता मोहिमेच्या  प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे ते, त्यांच्या संबंधित पंचायतींतील  इतर ग्रामस्थांना प्रशिक्षित करतील जेणेकरून प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश वाढेल. सदर कार्यक्रम ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हापसा, फोंडा, पेडणे, वाळपई, कुडचडे, डिचोली, पेडणे, पिळर्ण, वास्को, जुने गोवे, काणकोण, वेर्णा, पणजी व कुंडई येथील फायर स्टेशन्स आपल्या अधिकारक्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये प्रभावशाली पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत आहेत.  एलपीजी लिकेज, कोणत्याही आपत्तीच्या व निर्वासनाच्या प्रसंगी मुलांना हाताळणे याबाबतच्या सुरक्षा घटकांबाबत महिलांनाही प्रशिक्षित केले जात आहे. 

अनु. क्र. तालुक्याचे नाव 2014 पासून प्रशिक्षित केलेल्या ग्राम पंचायतींची संख्या
1 बार्देश 13
2 फोंडा 4
3 पेडणे 11
4 सत्तरी 9
5 केपे 9
6 डिचोली 12
7 सासष्टी 39
8 काणकोण 6
9 मुरगाव 1
10 तिसवाडी 2
एकूण 106

भारत सरकारने आपदा मित्र/आपदा सखी योजना सुरू केली आहे, ज्यात गोवा राज्यात आपदा मित्र योजना वाढविण्यासाठी गोवा सरकार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्यांतर्गत अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक हे गोवा राज्यासाठी नोडल अधिकारी आहेत.  खात्यातर्फे 350 समुदाय स्वयंसेवक (आपदा मित्र व आपदा सखी) नोंदणीकृत करून घेण्यात आले आहेत ज्यांच्या सेवा राज्यातील आपत्ती प्रतिसादावेळी, बचावावेळी व पुनर्वसनावेळी वापरल्या जातील. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे आणि यासाठीचे प्रशिक्षण 30 एप्रिलपासून सुरू झाले आहे.

राज्यातील कोणत्याही आपत्तीदरम्यान आपदा मित्र/आपदा सखी जनतेला साहाय्य करू शकतात. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत संकल्पना, आपत्ती सज्जता, मूलभूत शोध व बचाव, भूकंप व सुरक्षा, पूर/चक्रीवादळ/त्सुनामी, वैद्यकीय प्रथमोपचार, दोरीने बचाव आणि सुधारित पद्धती व पूर बचाव पद्धती सराव यासारख्या आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध घटकांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आजपर्यंत आपदा मित्रांच्या व आपदा सखींच्या खालील बॅचेसना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  

अनु. क्र. गट कालावधी प्रशिक्षित स्वयंसेवकांची संख्या (आपदा मित्र/आपदा सखी)
1 बॅच-I 23/04/2022 ते 07/05/2022 16
2 बॅच-II 10/05/2022 ते 23/05/2022 21
3 बॅच-III 31/05/2022 ते 13/06/2022 28
4 बॅच-IV 15/06/2022 ते 28/06/2022 31
5 बॅच-V 06/12/2022 ते 20/12/2022 40
6 बॅच-VI 22/12/2022 ते 04/01/2023 43
7 बॅच-VII 10/01/2023 ते 23/01/2023 44
8 बॅच-VIII 25/01/2023 ते 08/02/2023 17
9 बॅच-IX 13/02/2023 ते 27/02/2023 31
10 बॅच-X 01/03/2023 ते 15/03/2023 16
11 बॅच-XI 15/05/2023 ते 27/05/2023 39
12 बॅच-XII 15/06/2023 ते 28/06/2023 22
13 बॅच-XIII 30/08/2023 ते 12/09/2023 22
14 बॅच-XIV 17/10/2023 ते 31/10/2023 30
    एकूण 400

test