उद्देशिका:
आग ही लाभदायक व विनाशकारी अशी दोन्ही प्रकारची शक्ती समजली जाते. आगीच्या विनाशकारी क्षमतेमुळे आपल्या जीविताला, मालमत्तेला व संसाधनांना धोका संभवितो आणि मानवजातीच्या पालनपोषणाचा स्रोत असण्यासोबतच जीविताच्या नाशासाठीही ती तेवढीच जबाबदार आहे. जीविताचे व मालमत्तेचे आगीपासून व तत्सम प्रसंगांपासून संरक्षण करणे आणि आपल्या जबाबदारीच्या अधिकारक्षेत्रातील आगीच्या घटनांचा उद्रेक व त्यापासून होणारे नुकसान कमी करणे ही सार्वजनिक अग्निशमन सेवेची भूमिका आहे. हे ध्येय लक्षात ठेवून, संकटात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कार्यक्षम व प्रभावशाली अग्निशमन व आपत्कालीन सेवा पुरविण्याकरिता आणि गोवा राज्यातील आमच्या शाश्वत प्रयत्नांच्या माध्यमातून मिळविलेल्या लाभांचे संरक्षण करण्याकरिता 1984 साली अग्निशमन सेवा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. अग्निशमन सेवांच्या विकासासाठी सरकारतर्फे करण्यात आलेल्या काही प्रमुख उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत:-
1. | गोवा, दमण व दीव अग्निशामक दल अधिनियम | 1986 |
2. | गोवा राज्य अग्निशामक दल नियम | 1997 |
3. | गोवा राज्य अग्निशामक दल (दुय्यम) सेवा (शिस्त व अपील) नियम | 1989 |
4. | अग्निशमन सेवा कर्मचार्यांसाठी पुरस्कार/पारितोषिक देण्याची योजना | 1997 |
5. | गोवा मुख्यमंत्री अग्निशमन सेवा पदक नियम, 2000 आणि दुरुस्ती अधिसूचना | 2000 |
6. | अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या कर्मचार्यांना सेवेत असताना दिव्यांगत्व आल्यास अनुग्रहपूर्वक एकरकमी अनुदान प्रदान करणे. | 2014 |
खात्यातर्फे, संकटात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वसाधारणपणे आगीशी थेट संबंधित नसलेले आपत्कालीन प्रसंग हाताळले जातात. आपल्या अग्नि प्रतिबंध, आग विझविणे व प्रशिक्षण यांमधील उपक्रमांद्वारे गेल्या काही वर्षांमध्ये खात्याने लोकांच्या जीविताची व मालमत्तेची बचत व संरक्षण करून बहुआयामी भूमिका प्राप्त केली आहे. गोवा अग्निशमन सेवेने त्याला आलेली आव्हाने निपुणतेने हाताळली आहेत आणि त्या प्रक्रियेत “वाचविण्यासाठी आमची सेवा” हे आपले जोपासलेले ध्येय उचलून ठेवले आहे आणि राज्याचे भरवशाचे नागरी आपत्कालीन दल म्हणून आपली प्रतिष्ठा जपली आहे.
ऐतिहासिक दृष्टिकोन :
- गोव्याच्या मुक्तीनंतर, आगीपासून जीविताच्या व मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घेतली होती.
- अग्निशमन सेवा जे पोलिसांचे उपांग म्हणून कार्यरत होते ते अल्प-प्रशिक्षित व अल्प-युक्त होते.
- गतिशील औद्योगिकीकरण व शहरीकरण यांच्यासोबत वाढते आर्थिक उपक्रम व सरकारी कार्यचालन यांच्यामुळे एका सुसंघटित अग्निशमन खात्याची आवश्यकता भासू लागली होती.
- पोलीस खात्यापासून अग्निशमन सेवा वेगळी करण्यात आली आणि राज्यातील अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्याचा विकास करण्यासाठी अग्निशमन सेवा संचालनालय 1984 साली स्थापन करण्यात आले.
- 1988 साली गोवा हे भारतीय संघराज्याचे 25वे राज्य बनले आणि त्यानंतर अग्निशमन सेवेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा असे पुनर्नामकरण करण्यात आले.
- नियोजित अंदाजपत्रकांतर्गत फायर स्टेशन्सच्या स्थापनेसाठी आधुनिकीकरण योजना तयार करण्यात आली.
- आधुनिकीकरण योजनेमुळे गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवेचा असा विस्तार झाला आहे जो, देशात इतरत्र कुठेही झालेला नाही.
दूरदृष्टी:
- प्रतिबंधाचा व सज्जतेचा स्तर वाढविणे जेणेकरून राज्यातील आगीमुळे व इतर आपत्कालीन प्रसंगांमुळे होणारी जीवितांची व मालमत्तेची हानी कमी करणे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षेची जाणीव बिंबविणे.
मिशन:
- दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी मनुष्यबळ व सामग्री यांच्या बाबतीतली क्षमता वाढविणे;
- सर्व
- समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि आगीपासून होणारे नुकसान प्रतिबंधित करण्यासाठी व शमन करण्यासाठी प्रशिक्षण व शिक्षण यांच्या माध्यमातून व्यवसायातील सदस्यांना समृद्ध बनविणे आणि सुधारित सार्वजनिक सुरक्षेची सोय करणे.