test

कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी, त्वरित प्रतिसादासाठी अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांचे एकंदर ऑपरेशनल फिटनेस तपासण्यासाठी गोवा राज्यातील सर्व फायर स्टेशन्ससाठी 14 जानेवारी 2023 रोजी 35वी वार्षिक ड्रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सांत इनेज पणजी गोवा येथील अग्निशामक दल प्रशिक्षण मैदानावर ही स्पर्धा झाली. स्कॉड ड्रील, लॅडर ड्रील, पंप ड्रील व टग ऑफ वॉर यांचा समावेश असलेल्या वार्षिक ड्रील स्पर्धेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी उद्घाटन केले. अग्निशमन सेवा दलाच्या कर्मचार्‍यांची प्रतिभा प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि सहभागींना आपली कौशल्ये दाखविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही हा वार्षिक कार्यक्रम असतो.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या वार्षिक ड्रील स्पर्धेचे विजेते आहेत:

 

खेळ

विजेते

1.

स्कॉड ड्रील

:-

IST

अग्निशामक दल मुख्यालय

:-

IIND

म्हापसा फायर स्टेशन

:-

IIIRD

पिळर्ण फायर स्टेशन

2.

लॅडर ड्रील

:-

IST

अग्निशामक दल मुख्यालय

एकूण वेळ 1:45 मिनिटे

:-

IIND

म्हापसा फायर स्टेशन

एकूण वेळ 2:07 मिनिटे

:-

IIIRD

वाळपई फायर स्टेशन

एकूण वेळ 2:22 मिनिटे

3.

पंप ड्रील

:-

IST

अग्निशामक दल मुख्यालय

एकूण वेळ 3:28 मिनिटे

:-

IIND

पेडणे फायर स्टेशन

एकूण वेळ 3:33 मिनिटे

:-

IIIRD

म्हापसा फायर स्टेशन

एकूण वेळ 3:50 मिनिटे

4.

टग ऑफ वॉर

:-

 

फोंडा फायर स्टेशन

रवींद्र सिंग, सुभेदार भारतीय सैन्य आणि श्री. गोपाळ बी. शेट्ये, स्टेशन फायर अधिकारी (गोवा) (निवृत्त) यांनी खेळांचे परीक्षण केले. स्टेशन फायर अधिकारी श्री. श्रीपाद गांवस यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Marathi

test