test

अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाचा 39वा वार्षिक रेझिंग डे 21 जानेवारी 2023 रोजी 15:30 वा. अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र, सांत-इनेज, पणजी-गोवा येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यात गोवा राज्यातील अग्निसेवा कर्मचार्‍यांच्या 61 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी 2021-22 या वर्षासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांनी अभ्यासात प्रगती साधावी व भविष्यातील शैक्षणिक करिअरमध्ये यश मिळवावे असा सल्ला दिला. व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या गरजू विद्यार्थ्यांना भूतकाळातही गोवा अग्निशमन सेवा कल्याण निधीतून आर्थिक साहाय्य देण्यात आले असेही त्यांनी नमूद केले. तसेच, गरजू व पात्र विद्यार्थ्यांनाही हे साहाय्य लागू करावे असा निर्णय व्यवस्थापकीय समितीने घेतला असून, सरकारच्या मंजुरीने आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ते म्हणाले.

आखाडा सांत इस्तेव्ह येथील पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळाद्वारे सादर केलेल्या स्वागतगीताने वार्षिक रेझिंग डे कार्यक्रमाची सुरुवात झाली. अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विभागीय अधिकारी श्री. राजेंद्र ए. हळदणकर, उत्तर विभाग सहायक विभागीय अधिकारी अजित कामत, गोवा अग्निशमन सेवा कल्याण निधीचे माननीय सचिव श्री. दीपक सावंत आणि श्रीमती नेहा नितिन रायकर यांचीही उपस्थिती होती. स्टेशन फायर अधिकारी श्री. श्रीपाद गावस यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. 

Marathi

test