test

मंगळवार 14 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. यावर्षीचा राष्ट्रीय विषय होता.

Awareness in Fire Safety for Growth of National Infrastructure (AGNI)

राष्ट्रीय साधनसुविधा वाढीसाठी अग्नि सुरक्षेतील जागृती (AGNI).

14 एप्रिल 2023 रोजी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर, यांनी आणि उप-संचालक (अग्नि) ते फायर फायटर अशा सर्व गटांतील कर्मचार्‍यांनी पणजी येथील अग्निसेवा दल प्रशिक्षण मैदानावरील “शहीद स्मृती स्तंभा”वर पुष्पचक्र वाहिले. आपले कर्तव्य बजावत असताना प्राण गमावलेल्या शहीद फायरमॅनच्या स्मृतीप्रित्यर्थ  उपस्थित अधिकार्‍यांनी दोन मिनिटांची शांतता पाळली.  अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या संचालकांनी राष्ट्रीय अग्नि सेवा दिन पाळण्याचे महत्त्व विषद केले आणि आपले कर्तव्य बजावत असताना प्राण गमावलेल्या शहीद फायरमॅनची नावे वाचली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समारंभ संचलनाचा आढावा घेतला. गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्री. रमेश वर्मा, आयएएस व अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांच्या उपस्थितीत खात्याच्या विविध गटाच्या ऑपरेशनल अग्निसेवा कर्मचार्‍यांना बचाव कार्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल, चांगल्या शिस्तीबद्दल व सर्वसाधारण वर्तणुकीबद्दल  आणि आपल्या कर्तव्याप्रति निष्ठेबद्दल प्रशंसा प्रमाणपत्रे देण्यात आली.

. या जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून 01 व 02 एप्रिल 2023 रोजी प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी भित्तिचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात राज्यभरातील सर्व शाळांमधून 2200 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा दोन गटांत विभागण्यात आली होती, गट I (7-10 वर्षे) – विषय : आग व पर्यावरण आणि गट II (11-14 वर्षे) – विषय : कारखान्यांमधील अग्निसुरक्षा. स्पर्धेच्या दोन्ही गटांतील 1ल्या, 2र्‍या व 3र्‍या क्रमांकाच्या विजेत्यांना 14 एप्रिल 2023 रोजी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली.

प्रोग्रेसिव्ह मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या महाव्यवस्थापक श्रीमती शीतल वडेर यांनी खात्याने संचालकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण खात्याने व पल्या सेवेतील सर्वांनी गुणवत्ता व्यवस्थापनातील सज्जता व व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा सज्जता यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र म्हणजेच ISO 9001 & ISO 45001 प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल खात्याचे अभिनंदन केले. माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांना आयएसओ प्रमाणपत्रे प्रदान केली.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी आपल्या भाषणात 2022-23 साली खात्यातर्फे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मूलभूत अग्निसुरक्षा व निर्वासन ड्रील, सुरक्षित शाळा, सुरक्षित भारत आणि आपत्ती सज्जता व अग्निसुरक्षा प्रशिक्षण यांमधील विविध प्रशिक्षण उपक्रमांबाबत थोडक्यात आकडेवारीवजा माहिती दिली. खात्याने हाताळलेल्या आगीच्या व आपत्कालीन घटनांच्या नोंदी ठेवण्याचा एक भाग म्हणून खात्याने संक्षिप्त अहवालांसह ऑटोमेटेड डायनॅमिक लाईव्ह कॉल्स व स्टॅटिस्टिकल डॅशबोर्ड विकसित केला आहे, ज्यामुळे गोवा राज्यात होणार्‍या घटनांच्या प्रकारांनुसार आवश्यक संसाधनांची माहिती खात्याला मिळण्यास मदत होईल.

प्रमुख पाहुणे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पिळर्ण फायर स्टेशन येथील बर्जर बेकर कोटिंग्स प्रा. लि. येथील आग आणि दोन्ही उत्तर व दक्षिण गोव्यात लागलेल्या जंगलातील आग विझविण्यातील त्यांच्या त्वरित प्रतिसादासाठी खात्याच्या अधिकार्‍यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठीचे प्रतिष्ठित ISO 9001:2018 प्रमाणपत्र आणि व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठीचे 45001:2015 प्रमाणपत्र प्राप्त होणे हे राज्यासाठी व खात्यासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि इतर सर्व सरकारी खात्यांनी चांगल्या प्रगतीसाठी प्रमाणपत्रे स्वीकारावीत. 

खात्यातर्फे  सामान्य जनतेसाठी अग्निशामकाचे व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते आणि अग्निशामक, शोध व बचाव, गतिमान पाणी/पूर बचाव, वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता, नागरी शोध व बचाव यांच्याशी संबंधित विविध उपकरणांचे प्रदर्शन आणि प्रकाश उपकरणे सामान्य जनतेसाठी गोवा राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण मैदानावर प्रदर्शनार्थ मांडण्यात आली होती.

गोवा सरकारचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांच्या उपस्थितीत नवीन वॉटर टेंडरचे उद्घाटन केले.

अग्निशमन सेवा दल मुख्यालयाचे सहायक विभागीय अधिकारी श्री. अजित के. कामत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Marathi

test