test

श्री ताज हसन, आयपीएस, महासंचालक, अग्निसेवा, नागरी संरक्षण व होमगार्ड, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी 29 ऑक्टोबर 2023 रोजी सांत इनेज, पणजी येथील अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली.

आगमनावेळी सांत इनेज, पणजी – गोवा येथील अग्निसेवा दल मुख्यालय येथे अग्निसेवा कर्मचार्‍यांतर्फे त्यांना सैनिक सलामी देण्यात आली. अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी श्री. ताज हसन, आयपीएस, महासंचालक, अग्निसेवा, नागरी संरक्षण व होमगार्ड, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांना पुष्पगुच्छ, खात्याचे स्मृतीचिन्ह, फायरमॅन रेस्क्यू मॉडेल प्रदान केले आणि खात्याच्या उपक्रमांची थोडक्यात माहितीही दिली. श्री. ताज हसन, आयपीएस, महासंचालक, अग्निसेवा, नागरी संरक्षण व होमगार्ड, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी अग्निसेवा कर्मचार्‍यांना संबोधिले, ज्यात त्यांनी अग्निशमन क्षेत्रातील नवीन उभरत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आणि वीज ही आगीच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे नमूद केले आणि त्यामुळे अग्निसेवा अधिकार्‍यांनी नियामक नियमांनुसार इमारतींची तपासणी केली पाहिजे असेही सांगितले.  

पुढे त्यांनी आपदा मित्र/आपदा सखी स्वयंसेवकांचा आढावा घेतला ज्यात त्यांनी विविध आपत्तींच्या वेळी वापरावयाच्या आयुष्य वाचविणार्‍या सुधारित तंत्रांचे प्रदर्शन केले आणि त्यांनी त्यांच्या भेटीदरम्यान प्रदर्शनार्थ मांडण्यात आलेल्या विविध अग्निशामक, आपत्कालीन व आयुष्य वाचविणार्‍या साधनांचाही आढावा घेतला. नंतर त्यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशिक्षणार्थी उप-अधिकार्‍यांशी संवाद साधला आणि गोवा राज्य प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रातील त्यांच्या प्रशिक्षण उपक्रमांबाबत  आढावा व अभिप्राय घेतला.

विभागीय अधिकारी, उत्तर गोवा श्री. श्रीपाद गावस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Marathi

test