test

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाची 36वी वार्षिक तपासणी दिन परेड 16 मार्च 2024 रोजी सांत-इनेज, पणजी – गोवा येथील गोवा अग्निशामक दल प्रशिक्षण मैदानावर झाला. वार्षिक तपासणी दिन परेड हा आपत्कालीन घटनेच्या प्रसंगी त्वरित प्रतिसादासाठी अग्निसेवा कर्मचार्‍यांच्या ऑपरेशनल फिटनेसचा स्तर तपासण्यासाठीचा वार्षिक कार्यक्रम आहे. विविध अग्नि ड्रील स्पर्धांच्या विजेत्यांना व वार्षिक क्रीडा मेळाव्याच्या विजेत्यांना प्रमाणपत्रे व ट्रोफी देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गोवा सरकारचे प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कँडावेलू, आय.ए.एस. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी वार्षिक परेडची तपासणी केली आणि विविध श्रेणींमधील सर्वोत्कृष्ट अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांची सर्वोत्कृष्ट टर्न आऊट पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी सुरुवातीला स. 7.30 वा. वार्षिक परेडची तपासणी केली आणि विविध श्रेणींमधील सर्वोत्कृष्ट अग्निसेवा कर्मचार्‍यांची सर्वोत्कृष्ट टर्न आऊट पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. स्कॉड ड्रीलसाठी पणजी फायर स्टेशनला प्रथम बक्षीस प्राप्त झाले, लॅडर ड्रीलसाठी अग्निशामक  दल मुख्यालयाला प्रथम बक्षीस प्राप्त झाले, तर पंप ड्रीलचे प्रथम बक्षीस म्हापसा फायर स्टेशनला आणि टग ऑफ वॉरचे अग्निशामक दल मुख्यालयाला प्राप्त झाले. स्टेशन फायर अधिकारी श्री. गणेश गोवेकर, उप-अधिकारी श्री. रोहिदास डी. परब, श्री. सखाराम पेडणेकर व श्री. फ्रान्सिस्को आझावेदो,  प्रमुख फायर फायटर श्री. बाबलो माजिक, श्री. गुरुनाथ भट देसाई, श्री. उमेश आचारी व श्री. डॉमनिक मार्टिन्स, ड्रायव्हर ऑपरेटर श्री. ज्ञानेश्वर मांद्रेकर व फायर फायटर्स श्री. श्री. सतिश म्हामल, श्री. परेश मांद्रेकर व श्री. अविनाश गांवकर यांना सर्वोत्कृष्ट टर्न आऊट पुरस्कार देण्यात आले. स्टेशन फायर अधिकारी श्री. संतोष गावस यांच्या प्लॅटून क्र. 01 ला सर्वोत्कृष्ट प्लॅटून पुरस्कार देण्यात आला. 11 व्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे क्रिकेटमधील विजेतेपद केंद्रीय विभागाला, फुटबॉलमधील विजेतेपद दक्षिण विभागाला व व्हॉलीबॉलमधील विजेतेपद उत्तर विभागाला प्राप्त झाले.  

अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की वार्षिक तपासणी परेड हा खात्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्यात संचालनालयातर्फे मासिक परेडची आरोग्यदायी परंपरा राखली जाते ज्यामुळे फिल्डवरील कर्मचारी ऑपरेशनली फिट व टर्न आऊट राहतात. वार्षिक तपासणी परेड ही या प्रयत्नांची अंतिम पायरी आहे आणि यावेळी देण्यात आलेल्या बक्षीसांचा कामगिरीची मानके सुधारण्यावर प्रभाव पडतो. 

उंच इमारतींमध्ये अग्निशामकासाठी व जीवन बचावासाठी आणि प्रमुख आपत्ती हाताळण्यासाठी आधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी सरकारने दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी सरकारची प्रशंसा केली, कारण अग्निशामक क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे आयुष्य व मालमत्ता वाचविण्याची कामगिरी अधिक चांगली होण्यात मदत झाली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, काणकोण फायर स्टेशन सध्या कामचलाऊ जागेत कार्यरत आहे आणि खात्याने गोवा गृहनिर्माण मंडळाची जागा निश्चित केली आहे, ज्यात गोवा गृहनिर्माण मंडळाने 2275 चौ. मी. जागा देण्याचे मान्य केले आहे आणि जागा खरेदी करण्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे. श्री. नितिन रायकर यांनी आपल्या भाषणात माननीय प्रधान सचिव (वित्त) यांना केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व अग्निसेवा कर्मचार्‍यांना अग्नि धोका भत्त्याच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीकडे लक्ष देण्याची विनंती केली.

गोवा सरकारचे प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कांदावेलू, आय.ए.एस यांनी आपल्या भाषणात मार्च पास्ट, लॅडर ड्रील यांच्या कामगिरीचे व क्रीडा कार्यक्रमांच्या विजेत्यांचे कौतुकही केले. पुढे त्यांनी गेल्या तीन वर्षांतील आगीच्या व आपत्कालीन घटना हातळण्यातील खात्याच्या त्वरित व प्रभावशाली प्रतिसादाच्या कामगिरीची प्रशंसा केली. तसेच, खात्याच्या सुधारणेसाठीचे प्रस्ताव सरकारकडून कालबद्ध  पद्धतीने मिळविल्याबद्दल त्यांनी अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या संचालकांची प्रशंसा केली.

खात्यातर्फे लॅडर ड्रील कार्यक्रमाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते जो कार्यक्रम अग्निसेवा दलाच्या अग्निसेवा कर्मचार्‍यांनी प्रदर्शित केला जो 01.33 मिनिटांच्या वेळात उत्कृष्टपणे सादर करण्यात आला आणि अग्निशामन, शोध व बचाव, गतीमान पाणी/पूर बचाव, वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता, नागरी शोध व बचाव व प्रकाश साधने इ. संबंधित विविध साधने सामान्य जनतेसाठी गोवा राज्य अग्निसेवा दल प्रशिक्षण मैदानावर प्रदर्शनार्थ मांडण्यात आली होती.

सहायक विभागीय अधिकारी, श्री. अजित कामत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि यांनी आभार मानले.

Marathi

test