test

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवार 14 एप्रिल 2024 रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. यावर्षी अग्नि प्रतिबंध आठवड्यासाठी राष्ट्रीय विषय होता.

“Ensure Fire Safety, Contribute towards Nation Building”

“अग्नि सुरक्षा सुनिश्चित करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या”.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. संजित रॉड्रिग्स, आयएएस यांनी समारंभ संचलनाचा आढावा घेतला. गोवा सरकारचे सचिव श्री. संजित रॉड्रिग्स, आयएएस अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांच्या हस्ते  खात्याच्या विविध गटाच्या ऑपरेशनल अग्निसेवा कर्मचार्‍यांना बचाव कार्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल, चांगल्या शिस्तीबद्दल व सर्वसाधारण वर्तणुकीबद्दल  आणि आपल्या कर्तव्याप्रति निष्ठेबद्दल प्रशंसा प्रमाणपत्रे देण्यात आली.

श्री. नितिन व्ही. रायकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात राष्ट्रीय अग्नि सेवा दिनानंतर 14 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत अग्नि प्रतिबंध आठवडा साजरा केला जातो. यावर्षी “अग्नि सुरक्षा सुनिश्चित करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या” हा विषय आहे. अग्नि प्रतिबंध आठवड्यादरम्यान गोवा राज्यात जनतेसाठी विविध अग्नि सुरक्षा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञान घेण्याची विनंती जनतेला करण्यात येत आहे, जेणेकरून देशाची आयुष्ये व मालमत्ता वाचविण्यात लोकांना ते मदत करू शकतील. पुढे आपल्या भाषणात श्री. रायकर म्हणाले की, सावधगिरी बाळगली तरीही मानवी चुकांमुळे किंवा अपघातांमुळे आगीच्या घटना घडतातच. 2023-24 या काळात अग्निशमन व आपत्कालीन सेवेने एकत्रितपणे 8000 अग्नि व आपत्कालीन घटना हाताळल्या आहेत (3000 आगीच्या व 5000 आपत्कालीन), ज्यादरम्यान, 194 मानवी आयुष्ये व 757 जनावरांचे प्राण वाचविण्यात आले. अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांच्या योग्य वेळेवरील कृतीमुळे रु. 179 कोटी किंमतीची मालमत्ता वाचविण्यात आली.  

या जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 06 एप्रिल 2024 रोजी प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी भित्तिचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील सर्व शाळांमधून एकूण 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते.  स्पर्धा दोन गटांत विभागण्यात आली होती, गट I (7-10 वर्षे) – विषय : “अग्नि मित्र व अग्नि शत्रू” आणि गट II (11-14 वर्षे) – विषय : आगीमुळे पर्यावरणीय धोका. स्पर्धेच्या दोन्ही गटांतील 1ल्या, 2र्‍या व 3र्‍या क्रमांकाच्या विजेत्यांना 14 एप्रिल 2024 श्री. संजित रॉड्रिग्स यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली.

श्री. संजित रॉड्रिग्स यांनी आपल्या भाषणात आयुष्य वाचविण्याच्या आपल्या मिशनमध्ये भारतातील या उदात्त व्यवसायामध्ये आपले प्राण गमावलेल्या शहीदांना आदरांजली वाहिली. त्यांची आपल्या कर्तव्याप्रतिची निष्ठा नागरिकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. ते पुढे म्हणाले की देश व राज्य आर्थिक व सामाजिक विकास क्षेत्रात स्थिर प्रगती करीत आहे. दुर्दैवाने, या आपल्या लाभांवर आगीचा दुष्परिणाम होतो. वाढीत योगदान देऊ शकणारी आयुष्ये गमावली जातात. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट होते. या कारणामुळे, आपण प्राप्त केलेल्या विकासाचे संरक्षण करण्यासाठी आगीला प्रतिबंध घालण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे देशाने ठरविले आहे, हे लक्षवेधी आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय अग्निसेवा दिनाच्या विषयाचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. अग्निसेवा कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आणि राज्याला दिलेल्या शिस्तीच्या व प्रभावशाली सेवांसाठी त्यांनी खात्याचे कौतुक केले. 

त्यानंतर, मान्यवर, अग्निसेवा अधिकारी व कार्यक्रमाच्या इतर उपस्थितांनी “मतदानासारखे काही नाही, मी नक्की मतदान करेन” ही प्रतिज्ञा घेतली.

खात्यातर्फे  सामान्य जनतेसाठी अग्निशामकाचे व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते आणि अग्निशामक, शोध व बचाव, गतिमान पाणी/पूर बचाव, वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता, नागरी शोध व बचाव यांच्याशी संबंधित विविध उपकरणांचे प्रदर्शन आणि प्रकाश उपकरणे सामान्य जनतेसाठी गोवा राज्य अग्निशामक दल प्रशिक्षण मैदानावर प्रदर्शनार्थ मांडण्यात आली होती.

अग्निसेवा दल मुख्यालयाचे सहायक विभागीय अधिकारी श्री. अजित के. कामत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Marathi

test