या संचालनालयातर्फे 24.01.2024 ते 07.02.2024 पर्यंत ताज हॉटेल समुहाच्या कर्मचार्यांसाठी बॅच क्र. चा सर्वसाधारण अग्नि प्रतिबंध व अग्निशामक मधील विशेष अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात भारतातील राज्यांमधून 29 प्रशिक्षणार्थींनी 15 दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
या प्रशिक्षणात दोन्ही लेखी व प्रत्यक्ष वर्गांचा समावेश होता. अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर हे समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उप-संचालक (अग्नि) श्री. राजेंद्र ए. हळदणकर, क्षेत्र संचालक, ऑपरेशन्स गोवा श्री. अनमोल अहलुवालिया आणि व प्रशासन गोवा व्यवस्थापक श्री. सावियो डिमेलो यांची यावेळी उपस्थिती होती. संचालकांनी आपल्या भाषणात लेखी व प्रत्यक्ष मूल्यांकनात 1ला, 2रा व 3रा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल श्री. उनेज खान, कु. सौजन्या व श्री. सुभाष सिंग कंवल यांचे अभिनंदन केले. इतर उमोदवारांनाही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना मिळालेले प्रशिक्षण त्यांनी आपल्या संबंधित कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्यांसोबत सामायिक करावे व शिस्त पाळावी अशी विनंती केली.
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना अग्नि प्रतिबंध आणि निश्चित अग्निशामक इन्स्टॉलेशन, निर्वासन ड्रील प्रक्रिया, अग्निशामक क्षेत्रातील तांत्रिक प्रगती, आपत्ती व्यवस्थापन इ. सारख्या संरक्षण उपाययोजना यांवरील विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. खात्याने आजपर्यंत ताज समुहातील 770 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.
स्टेशन फायर अधिकारी श्री. रवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले व सहायक विभागीय अधिकारी (उत्तर विभाग) यांनी आभार मानले.