अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाचा वा वार्षिक रेझिंग डे 21 जानेवारी 2024 रोजी 09:45 वा. अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र, सांत-इनेज, पणजी-गोवा येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यात गोवा राज्यातील अग्निसेवा कर्मचार्यांच्या 79 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. अग्निशमन व आपत्कालीन संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उप-संचालक (अग्नि) श्री. राजेंद्र ए. हळदणकर, दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी श्री. फ्रान्सिस्को मेंडिस, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्री. श्रीपाद गावस, उत्तर विभागाचे सहायक विभागीय अधिकारी श्री. बॉस्को फेर्रांव, गोवा अग्निसेवा कल्याण निधीचे माननीय सचिव श्री. दीपक सावंत, गोवा अग्निसेवा कल्याण निधीचे माननीय खजिनदार श्री. सिम्सन आल्मेदा व श्रीमती नेहा नितिन रायकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी 2022-23 या वर्षासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांनी अभ्यासात प्रगती साधावी व भविष्यातील शैक्षणिक करिअरमध्ये यश मिळवावे असा सल्ला दिला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा आदर करावा व त्यांच्या आज्ञेचे पालन करावे आणि शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून चांगले विचार व सवयी आत्मसात कराव्यात असा सल्ला त्यांनी दिला. व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणार्या गरजू विद्यार्थ्यांना भूतकाळातही गोवा अग्निशमन सेवा कल्याण निधीतून आर्थिक साहाय्य देण्यात आले असेही त्यांनी नमूद केले. तसेच, गरजू व पात्र विद्यार्थ्यांनाही हे साहाय्य लागू करावे असा निर्णय व्यवस्थापकीय समितीने घेतला असून, सरकारच्या मंजुरीने आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ते म्हणाले.
वार्षिक रेझिंग डे कार्यक्रमावेळी मुलांच्या मनोरंजनासाठी जादुच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी येथील जादूगर केतन कुमार व त्यांच्या समुहाने एक तासाच्या खेळात प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विशेष प्रकारचा हा खेळ होता.
स्टेशन फायर अधिकारी श्री. रवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.