test

कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी, त्वरित प्रतिसादासाठी अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांचे एकंदर कार्यान्वयन आरोग्य तपासण्यासाठी गोवा राज्यातील सर्व फायर स्टेशन्ससाठी 18 नोव्हेंबर 2023 रोजी 35वी वार्षिक ड्रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सांत इनेज पणजी गोवा येथील अग्निसेवा प्रशिक्षण मैदानावर ही स्पर्धा झाली. स्कॉड ड्रील, लॅडर ड्रील, पंप ड्रील व टग ऑफ वॉर यांचा समावेश असलेल्या वार्षिक ड्रील स्पर्धेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी उद्घाटन केले. अग्निशमन सेवा दलाच्या कर्मचार्‍यांची प्रतिभा प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि सहभागींना आपली कौशल्ये दाखविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही हा वार्षिक कार्यक्रम असतो.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या वार्षिक ड्रील स्पर्धेचे विजेते आहेत:

 

खेळ

विजेते

1.

स्कॉड ड्रील

:-

IST

पणजी फायर स्टेशन

:-

IIND

मडगाव फायर स्टेशन

:-

IIIRD

फोंडा फायर स्टेशन

2.

लॅडर ड्रील

:-

IST

अग्निशामक दल मुख्यालय

एकूण वेळ 1 मिनिट:37 सेकंद

:-

IIND

म्हापसा फायर स्टेशन

एकूण वेळ 2 मिनिटे:03 सेकंद

:-

IIIRD

पेडणे फायर स्टेशन

एकूण वेळ 2 मिनिटे:12 सेकंद

3.

पंप ड्रील

:-

IST

म्हापसा फायर स्टेशन

एकूण वेळ 3 मिनिटे:38 सेकंद

:-

IIND

पेडणे फायर स्टेशन

एकूण वेळ 3 मिनिटे:40 सेकंद

:-

IIIRD

डिचोली फायर स्टेशन

एकूण वेळ 3 मिनिटे:52 सेकंद

4.

टग ऑफ वॉर

:-

 

अग्निशामक दल मुख्यालय

 

सुभेदार रवींद्र सिंग, गोवा एनसीसी बटालियन आणि श्री. गोपाळ बी. शेट्ये, स्टेशन फायर अधिकारी (गोवा) (निवृत्त) यांनी खेळांचे परीक्षण केले. स्टेशन फायर अधिकारी श्री. रवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Marathi

test