test

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे 06 मे 2023 रोजी 11.30 वा. सांत इनेज, पणजी-गोवा येथील अग्निशामक दल मुख्यालयाच्या वर्गात आपदा मित्र/आपदा सखी यांच्यासाठी  इमर्जन्सी रिस्पॉन्डर किट (ईआरके), ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ आजित करण्यात आला होता.

यांनी अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी बॅच V ते X च्या सर्व आपदा मित्र/आपदा सखी यांचे 12 दिवशीय प्रशिक्षणासाठी अभिनंदन केले आणि प्रत्येक सहभागीला इमर्जन्सी रिस्पॉन्डर किट (ईआरके), ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वितरित केले.

तुकडी V ते X च्या सर्व आपदा मित्र/आपदा सखी यांना आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत संकल्पना, आपत्ती सज्जता, मूलभूत शोध व बचाव, भूकंप व सुरक्षा, पूर/चक्रीवादळ/त्सुनामी, वैद्यकीय प्रथमोपचार, दोरी बचाव आणि सुधारित पद्धती व पूर बचाव पद्धती सराव यासारख्या आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध घटकांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

स्टेशन फायर अधिकारी श्री. राहुल देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि सहायक विभागीय अधिकारी श्री. बॉस्को फेर्रांव यांनी आभार मानले.

Marathi

test