अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय तुमच्याकडून स्वयंचलितपणे कोणतीही विशिष्ट माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा इ-मेल ऍड्रेस) घेत नाही, ज्यामुळे आम्ही तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखू शकू. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती जसे नाव व पत्ते, आम्हाला द्यायचे ठरविल्यास, जेव्हा तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट देता तेव्हा तुमच्या माहितीची विनंती पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्याचा वापर करतो. लाईव्ह कॉल्स अलर्टस वापरण्यासाठी या संकेतस्थळाला वापरकर्ता नोंदणीची गरज आहे. अशा प्रकारे गोळा केलेली माहिती, घटनांचे एसएमएस व ईमेल्स पाठविण्यासाठी केला जातो.
या संकेतस्थळावर स्वत:हून दिलेली कोणतीही वैयक्तिक ओळख पटविणारी माहिती थर्ड पार्टीला (सार्वजनिक/खासगी) आम्ही विकत नाही किंवा सामायिक करत नाही. या संकेतस्थळाला दिलेल्या कोणत्याही माहितीची हानी, गैरवापर, बेकायदेशीर वापर किंवा माहिती उघड करणे, बदल किंवा नष्ट करणे यांपासून रक्षण केले जाईल.
आम्ही वापरकर्त्याबद्दल विशिष्ट माहिती गोळा करतो, जसे इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) ऍड्रेस, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेट दिलेली तारीख व वेळ आणि भेट दिलेल्या पेजेस. साईटला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न दिसून येत नाही तोपर्यंत आमच्या साईटला भेट दिलेल्या व्यक्तींशी हे ऍड्रेस लिंक करण्याचा आम्ही कधीच प्रयत्न करीत नाही.
कुकीजचा वापर:
कुकी हा एक सॉफ्टवेअर कोड आहे जो एखाद्या संकेतस्थळाला तुम्ही भेट देता तेव्हा इंटरनेट संकेतस्थळ तुमच्या ब्राउजरला पाठवितो. कुकी हा संकेतस्थळाच्या सर्व्हरद्वारे तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर एक साधी टेक्स्ट फाईल म्हणून स्टोअर केली जाते आणि केवळ तोच सर्व्हर त्या कुकीचा मजकूर पुन्हा मिळवू शकतो किंवा वाचू शकतो. कुकीज तुमची प्राधान्ये स्टोअर करीत असल्यामुळे ती तुम्हाला पेजेसदरम्यान प्रभावीपणे नेव्हिगेट करू देतात, आणि तुमचा संकेतस्थळाचा अनुभव एकंदरितपणे सुधारतो. ब्राउजिंग पॅटर्न्सचा ट्रॅक ठेवण्यासाठी जेव्हा तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट देता तेव्हा तुमचा संगणक किंवा मोबाईल अनामितपणे लक्षात ठेवण्यासाठी ऍनालिटिक्स कुकीज.
आमचे संकेतस्थळ प्रभावीपणे काम करण्यात, तुमचे नोंदणीचे व लॉग इन तपशील लक्षात ठेवण्यात, आणि तुम्ही पाहिलेल्या पेजेसचा ट्रॅक ठेवण्यात आम्हाला मदत करण्यासाठी सर्व्हिस कुकीज.
नॉन-पर्सिस्टंट कुकीज म्हणजेच पर-सेशन कुकीज. पर-सेशन कुकीज तांत्रिक उद्देशासाठी असतात, जसे या संकेतस्थळावर अडथळ्याविना नेव्हिगेट करणे. या कुकीज वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करीत नाहीत आणि तुम्ही संकेतस्थळ सोडल्यावर लगेच त्या डिलिट केल्या जातात. कुकीज कायमस्वरूपी डेटा रेकॉर्ड करत नाहीत आणि त्या तुमच्या संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर स्टोअर केल्या जात नाहीत. कुकीज मेमरीमध्ये स्टोअर केल्या जातात आणि त्या केवळ सक्रीय ब्राऊजर सेशनवेळीच उपलब्ध असतात. पुन्हा, एकदा तुम्ही ब्राउजर बंद केल्यानंतर, कुकी गायब होते.
तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही संकेतस्थळाच्या त्या भागांना भेट देता जेथे तुम्हाला लॉग इन करावयास सांगितले जाते, किंवा ज्या कस्टमाइजेबल असतात, तुम्हाला कुकीज ऍक्सेप्ट कराव्या लागू शकतात. तुम्ही तुमच्या ब्राउजरला कुकीज रिफ्युज करायला लावल्यास, असे होऊ शकते की आमच्या संकेतस्थळाचे काही भाग योग्यरित्या काम करणार नाहीत.